Top News मुंबई

फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन!

मुंबई | फेक टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान विकास खानचंदानी यांना मुंबईतील न्यायालयाने अखेर आज जामीन दिलाय.

विकास खानचंदानी यांचे वकील नितीन प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या एका न्यायालयाने खानचंदानी यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून फेक टीआरपी घोटाळा उघड करण्यात आला होता. त्यामध्ये 12 डिसेंबर रोजी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली होती.

टेलीव्हिजन रेटींग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिलद्वारे हंसा रिसर्च एजन्सीच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती. या घोटाळ्यामध्ये बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करत काही जणांना अटक केली होती.

थोडक्यात बातम्या-

राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवल

“गुडघ्यात मेंदू असलेलं सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या