उत्तराखंड | उत्तराखंडमध्ये आज हिमकडा कोसळून हाहाकार माजला आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मात्र एकाला भुयारातून वाचवण्यात जवानांना यश आलं आहे.
भुयारातून एकाला बाहेर काढतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. यामध्ये आयटीबीपीच्या टीमने एकाला गाळातून बाहेर काढलं आहे.
तपोवन डॅमच्या जवळ एका टनेलमध्ये नदीतून वाहून आलेल्या गाळात एक जण गाडला गेलेला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं.
दरम्यान, उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
#WATCH | Uttarakhand: ITBP personnel rescue one person who was trapped in the tunnel near Tapovan dam in Chamoli.
Rescue operation underway.
(Video Source: ITBP) pic.twitter.com/RO91YhIdyo
— ANI (@ANI) February 7, 2021
थोडक्यात बातम्या-
…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार
अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
…म्हणून उद्घाटनाला अमित शहांना बोलावलं- नारायण राणे
मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा
“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”