बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का

बारामती | रासपचे बारामती लोकसभा प्रमुख बापूराव सोलनकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे. सोलनकर हे चळवळीतील वजनदार कार्यकर्ते आहेत.

पक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न करता कुरघोड्या करत करतात. त्यामुळे अनेक पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले आहेत. या गोष्टीकडे महादेव जानकरही दुर्लक्ष करत आहेत, असं सोलनकर यांनी म्हटलं आहे.

अनेक लोकं पक्षात असून पक्ष वाढवण्याऐवजी पक्ष संपवण्याचं काम करत असल्याचंही सोलनकर म्हणाले.

दरम्यान, सोलनकरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”

-पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच : गिरीष बापट

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका

युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र