Top News महाराष्ट्र मुंबई

हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाले, आता राज्य सरकार धार्मिक स्थळेही उघडणार का?

मुंबई  | सोमवारपासून संपूर्ण राज्यातील रेस्टॉरंट बार सुरु करण्यात आले आहेत. आता मंदिरे व धार्मिक स्थळे लवकरच उघडण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेते नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

धार्मिक स्थळे उघडल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या उपाय याेजनांबाबही धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, विविध राज्यांनी धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या-

कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या