बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीसंदर्भातील नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

पुणे | दिवाळी अवघ्या आठवड्यावर येवून ठेपली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुणे प्रशासनाने दिवाळी संदर्भातील नियमावली काढली आहे. यामध्ये यावर्षी विदेशी फटाक्यांच्या विक्रीला पुणे शहरात पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त कार्यालयाने दिवाळी सणासाठी फटाके विक्रीचे परवाने दुकानदारांना दिले आहेत. मात्र यामध्ये काही अटीही आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या आहेत. याबाबतची नियमावलीदेखील या दुकानदारांना दिली आहे. या दुकानदारांना 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत फटाके विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

नियमावलीनुसार, दुकानदारांना विदेशी फटाके विकता येणार नाहीत. तसेच मुदत संपलेले फटाके किंवा शोभेच्या दारूची विक्रीही दुकानदारांना करता येणार नाहीये. याशिवाय फटाकेविक्रीची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेले फटाके परवाना असलेल्या गोदामात परत करणे  दुकानदारांना बंधनकारक असणार आहे.

दिवाळीमध्ये नागरिकांनाही काही नियमांचे पालन करावं लागणार आहे. फटाके विक्रीची परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी 50 मीटर अंतरात फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय आयुक्तलयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटरच्या आत फटाके फोडण्यास आणि शोभेची दारू उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, वाचा आजचे ताजे दर

‘… तर समीर वानखेडेंची बदली केली जाईल’, एनसीबी महासंचालकांनी केलं स्पष्ट

सततच्या परिक्षेच्या गोंधळावरून अखेर आरोग्य विभागाने उचललं ‘हे’ पाऊल

“सत्य कथन करून मलिकांनी झाकली मुठच उघड केली”

लोकल प्रवास करायचा असेल तर आता ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More