“राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्या”
मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये सतत खटके उडताना दिसतात. सध्या राज्यपाल हिंगोली, परभणी आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या याच दौऱ्यावरुन आज अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांना तिखट शब्दात प्रतिउत्तर दिलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात गैर काय आहे, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. तसेच नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यावा. नागरिकांचे प्रश्न तरी लक्षात येतील, असा टोला दरेकर यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत, ते आता राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला होता. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली होती.
सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळाढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचं देखील नवाब मलिकांनी यावेळी सांगितलं होतं.
थोडक्यात बातम्या –
पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव
शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”
अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पवार म्हणाले…
Comments are closed.