बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांचा रिक्षा प्रवास येत्या 22 तारखेपासून महागणार, काय असणार नवे दर?

पुणे | पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करायचा असेल तर अतिरीक्त पैसे मोजावे लागणार आहेत. महागाई आणि इंधन दरवाढीला आधीच कंटाळल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रवासही महागणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पुण्यात दीड किलोमिटर अंतरासाठी पहिल्या टप्प्याला 18 रुपये दर आकारला जात आहे. पण आता 22 नोव्हेंबरपासून या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दीड किमीच्या वरच्या प्रवासासाठी 12 रुपये 31 पैसे शुल्क आकारला जातो. तसेच आता यात येत्या 22 तारखेपासून वाढ करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत पुण्यातील रिक्षा भाडेवाढी संदर्भात प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता.

पुण्यात रिक्षा प्रवास करायचा असेल तर आता पहिल्या दीड किमीसाठी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात शेवटची रिक्षाभाडेवाढ ही 2015 साली करण्यात आली होती. त्यात मागच्या वर्षी याबाबत निर्णय होणं अपेक्षित होतं. पण कोरोनामुळे तो निर्णयही होऊ शकला नाही. अखेर आता ऱिक्षा भाडेवाढीला हिरवा कंदील मिळाला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नवे दर लागू असणार आहेत. नव्या दरानुसार आता पहिल्या दीड किमीसाठी 21 रुपये तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी 14 रुपये आकारले जाणार आहेत. इंधनाचे दर वाढले असताना रिक्षा चालकांनीही भाडेवाढीचा मुद्दा लावून धरला होता. तसेच आता रिक्षा भाडेवाढ होणार असल्याने रिक्षाचालकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“देवेंद्रजी उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही”

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात पण मृतांचा आकडा वाढला

“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था”

‘पद्म पुरस्कार येत आहे’; विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेत्रीने साधला निशाणा

” उद्धव ठाकरे तर पार्टटाईम मुख्यमंत्री, फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा “

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More