बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेव्हा मी खूप नाराज झाले होते”, रिंकू राजगुरुचा मोठा खुलासा

मुंबई | सैराट चित्रपटानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. सैराटनं महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर देखील मोठं नाव कमावलं होतं. सैराटच्या कलाकारांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली होती. सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं सैराटनंतर काही चित्रपट केले आहेत. परंतू तिचे सैराट नंतरचे चित्रपट जास्त चालले नाही. तिचा ‘कागर’ चित्रपट चालला नसल्यानं ती नाराज होती, असं रिंकूनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

मला माहित आहे की, प्रत्येक चित्रपट सैराटसारखा यशस्वी होईलच असं नाही. यश आणि अपयशाचा मी माझ्या आयुष्यावर जास्त परिणाम होऊ देत नाही. माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मी माझ्या पात्राला 100% देते. प्रेक्षकांनी माझ्या कामाचं कौतुक करावं आणि माझा चांगला परफाॅर्मन्स लक्षात ठेवावा अशीच माझी इच्छा आहे, असं रिंकू राजगुरू मुलाखतीत म्हणाली आहे.

प्रेक्षकांकडून तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत, याचं तुला दडपण येत का? असं प्रश्न विचारल्यावर रिंकू म्हणाली की, मी फक्त चित्रपटाच्या कथेला आणि माझ्या भुमिकेला जास्त महत्व देते. मी चित्रपटाच्या भवितव्याचा जास्त विचार करत नाही. कारण त्यासाठी चित्रपटातील सर्वच जण जबाबदार असतात. कागर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी नाराज झाले होते. लोकांना माझा चित्रपट आवडला नाही तर ठीक आहे, पण त्या अपयशाचा परिणाम मी माझ्यावर होऊ देत नाही, असं रिंकू म्हणाली.

दरम्यान, सैराटनंतर कागर आणि मेकअप या दोन मराठी चित्रपटात रिंकूने काम केलं होतं. तर हंड्रेड आणि अनपाॅज्ड या दोन हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकली होती. तर आता नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटातून रिंकू बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

‘फडणवीस सरकारच्या काळात आरएसएसचा वाटा किती?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

अभिनेता आमीर खानलाही कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत झाला कार्यक्रम

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More