खेळ

…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

लंडन | दुखापतग्रस्त शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला दाखल होणाऱ्या रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही. तसेच त्याला ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करता येणार नाही आणि भारतीय संघासोबत प्रवासही करता येणार नाही. याला कारण आहे आयसीसीचा एक नियम.

शिखर धवन दुखापतीमुळे जायबंदी झाला असला तरी बीसीसीआयने त्याला अद्याप संघाबाहेर काढलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत हा निर्णय घेत नाही तोपर्यंत रिषभ पंतला संघासोबत राहता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनला दुखापत झाली. तो विश्वचषकात खेळू शकणार नाही, असं वृत्त पहिल्यांदा आलं होतं.

दरम्यान, बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे शिखर धवन लवकरात लवकर फिट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या

-हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

-रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

-आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

-“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

-वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या