बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिया चक्रवर्ती ठरणार बिग बॉसमधील सर्वात महागडी स्पर्धक??; तब्बल ‘इतक्या’ लाखांची ऑफर!

मुंबई | बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिंदीमधील छोट्या पडद्यावरील बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या 15 सीझनमध्ये रिया चक्रवर्ती सहभाग घेणार असुन त्यासाठी बिग बॉसने रियाला मोठी ऑफर दिल्याचं समजत आहे.

बिग बॉस 15 मध्ये रिया चक्रवर्तीसोबत तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, सिंबा नागपाल, अफसाना खान आणि प्रतीक जयस्वाल हे सहभागी होणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी रियाला दर आठवड्याला 35 लाख रूपये देणार आहे. त्यामुळे रिया बिग बॉसची आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक ठरणार आहे.

रिया काही दिवसांपूर्वी अंधेरीच्या एका स्टुडिओमध्ये  स्पॉट झाली होती. तेव्हा त्या ठिकाणी बिग बॉसचे 15 चे स्पर्धक देखील उपस्थित होते. तेव्हा पासून रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे बिग बॉसला चाहत्यांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. बिग बॉसचे आतापर्यंत 14 सीझन झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राला केली ‘ही’ विनंती!

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More