बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…आता अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती

मुंबई | सुशांत आत्महत्या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. तसेच रियानं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यावर देखील निशाणा साधला आहे.

गेल्या चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलतेय, असा सवाल रियाने अंकिता लोखंडेला केला आहे. तसेच अंकिता सुशांत गेल्यानंतर त्याची विधवा असल्याचं नाटक करतेय, असं रिया म्हणाली आहे.

सुशांतच्या मित्रासोबतच ती आता रिलेशनशीपध्ये आहे. तिचं हे वागणं समजण्यापलीकडचं आहे. सुशांतच्या घरात राहून घराचे कागदपत्र दाखवते. तिला नक्की काय साध्य करायचं आहे, असं रिया म्हणाली आहे.

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर एक्स गर्लफ्रेंड अंकितानं सुशांतच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, तसंच सुशांतच्या कुटुंबियांच्या बाजूनं उभ राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं रियानं अंकितावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेत्यांना खरंच महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर….- रोहित पवार

देशात कोरोनाचा प्रकोप, गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

सिद्धीविनायकाचं आता घरबसल्या दर्शन घेता येणार तसंच पूजा करता येणार…!

….म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो अ‌ॅबे यांनी दिला राजीनामा

आनंदाची बातमी… राज्यात कोरोनामुक्तांची संख्या पोहोचली साडेपाच लाखाच्या उंबरठ्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More