मलिष्काच्या घराची पालिकेकडून तपासणी, डेंग्यूच्या अळ्या सापडल्या!

मलिष्काच्या घराची पालिकेकडून तपासणी, डेंग्यूच्या अळ्या सापडल्या!

मुंबई | ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?’, असं गाणं रचल्याने वादात सापडलेल्या आरजे मलिष्काच्या घरी पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी त्यांना डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचा दावा करण्यात आलाय. 

वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये ही पाहणी करण्यात आली. यावेळी लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. लिली मलिष्काच्या आई आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पालिकेने लिली यांना नोटीस पाठवल्याचं कळतंय. याप्रकरणी आरजे मलिष्का किंवा लिली यांचं स्पष्टीकरण अद्याप मिळू शकलेलं नाही. 

Google+ Linkedin