पुणे | लहानपणी वडिलांचं छत्र हरपलेल्या आणि दहावीत ९०.८० टक्के गुण मिळवलेल्या शेतकरीकन्येच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उचलला आहे. त्यांनी फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.
अनुजा रोडे असं या मुलीचं नाव आहे. ७ वर्षांची असताना हृदयविकाराच्या झटक्याने तीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर शेतात राबून तिच्या आईनं तिचं शिक्षण केलं.
मुलगी हुशार होती. दहावीला ९०.८० टक्के गुण मिळाले. मात्र गरीबीमुळे पुढचं शिक्षण कसं घ्यायचं?, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता.
दरम्यान, रोहित पवार यांना ही गोष्ट समजताच त्यांनी या कुटुंबाची भेट घेतली आणि अनुजाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
-पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय अत्यंत धक्कादायक माहिती
-धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा
-मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन
-“मी टोपी टाकली अन् ती विश्वजीत कदमांना बसली”
-भारतीय संघाचं नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं ‘हे’ उत्तर
Comments are closed.