बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | समाज माध्यमांच्या वापरावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियावर वाढत असलेल्या बदनामीकारक आणि समाजविघातक पोस्ट थांबवण्यासाठी गंभीर पाऊले उचलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

खोट्या बातम्या आणि राजकीय द्वेषातून होणारी खालच्या पातळीची टीका आणि त्यातून होणारे वाद तसेच महिलांच्या बाबतीत समाज माध्यमांवर बदनामीकारक माॅर्फ केलेले फोटोज आणि व्हिडिओज पसरवणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एखादा व्हिडिओ किंवा फोटो सर्वात आधी कोणी पोस्ट केला त्याबद्दलची माहिती केंद्र सरकारला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या या समाजमाध्यम नियंत्रणावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे सडकून टीका केली आहे. ‘2014 पासून सोशल मीडियाच्या बळावरच भाजप सत्तेत आहे. असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.’ अशा शब्दात रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच हे सोशल मीडियाचं अस्त्र आपल्यावरच आता उलटत असल्यानं केंद्र सरकारने त्याच्यावर बंधनं घालण्याचा घाट घातल्याचंही त्यांनी लिहलं आहे.

महागाई, बेरोजगारी आणि देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे. पण सरकारला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. समाज माध्यमांचा वापर करून त्यावर व्यक्त होणारे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणारे अभ्यासक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते हे सरकारला खूपत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आता सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

भाजप सरकारतर्फे सरकार समर्थक, सरकार विरोधक आणि काठावरचे असे तीन गट करून काळा, पांढरा आणि हिरवा रंग अशी विभागणी करण्याच्या सूचनाही सरकार पातळीवर देण्यात आल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ज्यामध्ये सरकारला विरोध करणाऱ्यांसाठी काळा रंग, सरकारच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकांसाठी पांढरा रंग तर काठावर असणाऱ्यांसाठी हिरवा रंग अशी विभागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच हे सगळं पाहिल्यानंतर भाजप सोबत, भाजप विरोधात आणि तटस्थ असलेल्या मतदारांची वर्गवारी करून विरोधकांना दाबण्याचा एखादा फतवा भाजपकडून काढला जातो की काय? अशी भीती वाटते. अशा प्रकारच्या भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे जर त्याचा कोणी दुरुपयोग करत असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे .परंतु, आमच्याविरोधात जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही हे धोरण सध्या प्रस्थापित होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच देशातील युवा वर्ग आणि सजग नागरिकांनी याविरोधात वेळीच आवाज उठवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच भविष्यात भोगावे लागतील अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या –

न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर

गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More