बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

मुंबई | मुंबई-गोवा-मुंबई जाणाऱ्या क्रुझवर एनसीबीनं शनिवारी छापा टाकला. एनसीबीनं टाकलेल्या आतापर्यंतच्या छाप्यांपैकी हा सर्वात मोठा छापा होता. या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात टाकलेल्या छाप्यात एनसीबीनं अनेकांना ताब्यात घेतलं. अभिनेता शाहरुख खानच्या मुलालाही याप्रकरणी अटक केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अशातच आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक क्षेत्रातून प्रतिक्रिया दिल्या गेल्या. हळूहळू या प्रकरणानं राजकीय वळण घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. यातच आता रोहित पवारांनी याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही. मात्र कोणावर कारवाई होत असेल, तर सगळ्यांना समान न्याय असायला हवा. एनसीबीच्या कारवाईत काही भाजपाचे कार्यकर्ते होते. हे पाहाता काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहत आहे. त्याची उत्तरं दिलीच पाहिजे. कोणतीही कारवाई राजकीय हेतूनं न होता योग्य पद्धतीने व्हावी’, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनसह सात जणांना अटक केली होती. याप्रकरणी आता एकूण 19 जणांना अटक करण्यात आलं. परवाच याप्रकरणी एनसीबीनं चित्रपट निर्माता इम्तियाज अलीच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

थोडक्यात बातम्या – 

”प्रियंका गांधीला झाडू मारावी लागली त्यात महाविकास आघाडीला वाईट वाटायचं कारण काय?”

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

आजच्या महाराष्ट्र बंदला ‘या’ संघटनांचा असणार सक्रिय पाठिंबा

आज महाराष्ट्र बंदची हाक! कोणत्या सेवांवर होणार परिणाम?, वाचा सविस्तर

‘गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; नवाब मलिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More