Top News पुणे महाराष्ट्र

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

पुणे | रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या करार शेतीचे बॅनर सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड सुरु झाली असून एकीकडे आपल्या कंपनीच्या माध्यमातून फायदा घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकरी कायद्यांना विरोध करायचा, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

भाजपच्या नेत्यांनी या मुद्द्यावर रोहित पवार यांना घेरलं आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी याप्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आणि यापुढेही करत राहीन, असं त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये करार शेतीचं समर्थन केलं आहे. कंत्राटी शेती काळानूसार निश्चितच आली पाहिजे, मात्र वाद उद्भवला तर सामान्य शेतकरी कंपन्यांसोबत कायदेशील लढा लढू शकतील का?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मी सांगितल्या आहेत. शेतकरी हिताच्या तरतुदींची मागणी करणे दुटप्पीपणा आहे का?, असेल तर हो मी हा दुटप्पीपणा करतोय, असं रोहित पवार म्हणाले. काही न्यूज पोर्टल्सनी माझ्या जुन्या पोस्टआधारे केलेला आरोप अर्धवट आणि एकांगी पद्धतीने करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट-

 

कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे….

Posted by Rohit Rajendra Pawar on Monday, 25 January 2021

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

देशातला सर्वसामान्य माणूस कायदा आणि तुम्हाला दोघांनाही उद्ध्वस्त करणार- शरद पवार

गुदगुल्या करणं जीवावर बेतलं; दोन मित्रांच्या मृत्यूनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या