Top News महाराष्ट्र मुंबई

पार्थ प्रकरणावर रोहित पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…..

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर जाहीररित्या फटकारलं. यानंतर पवार कुटुंबात कलह सुरू झाल्याची चर्चा आहे. तसंच पक्षात देखील एक प्रकारची अस्वस्थता आहे. या प्रकारावर पवार कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

पार्थ पवार हा विषय हा कौटुंबिक आहे. कौटुंबिक विषयावर राजकारण होतं आहे, असं सध्या दिसत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी याविषयावर तसंच कौटुंबिक प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात राजकारण होत आहे. हे मी आधीपासून सांगत होतो. ते आता दिसून येत आहे. परंतू या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असं देखील रोहित म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी मिळते आहे, असं वृत्त समोर येत आहे. यावर बोलताना रोहित यांनी फडणवीसांना टोला लगावला. ते म्हणाले, “भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचं कनेक्शन आहे. यावरुन राजकारण होऊ नये”

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यात घडलेल्या ‘या’ प्रकारानं पोलिसांची प्रतिमा मलीन; एका पोलिसाचं निलंबन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या