Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार

मुंबई | देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारवर टीका करत असलेल्या भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

2014 मध्ये भाजपने सत्ता हातात घेतली तेंव्हा पेट्रोलवर 9.5 रु कर आकारला जात होता. आज हाच कर 32.90 रु वर गेला. म्हणजेच त्यात तब्बल 350% नी वाढ झाली. डिझेलबाबत बघितलं तर 2014 मध्ये केंद्र सरकार 3.56 रु कर आकारात होतं, आज त्यात सुमारे 900% वाढ झाली असून आज तो 31.80 रु पर्यंत पोहचला, असल्याचं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारची चलाखी बघायची असेल तर याचं एक ताजं उदाहरण बघता येईल. बजेटमध्ये केंद्राने 2.5 रु प्रती लिटर कृषि सेस लावला आणि 2.5 रु एक्साइज ड्युटी कमी केली. त्यात बेसिक एक्साइज ड्युटीमध्ये 1.5 रु तर स्पेशल एक्साइज ड्युटीमध्ये 1 रु कमी केला. पण यात महत्वाचं म्हणजे राज्यांना केवळ बेसिक एक्साइज ड्युटीमध्येच वाटा मिळतो आणि केंद्राने नेमकी त्यातच कपात केली, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारला कर कमी करायला लावण्याऐवजी उलट राज्य सरकारने कर कमी करावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जातेय याला काय म्हणावं? अशी मागणी करणाऱ्यांना किमान जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरेंचं नेमकं बोट; पाहा व्हिडीओ

‘आम्ही शरजीलसोबत आहोत’; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा उस्मानीला पाठिंबा

धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं

“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या