औरंगाबाद महाराष्ट्र

“भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत”

Loading...

उस्मानाबाद | सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य करत भाजपलाही टोला लगावला आहे.

इंदोरीकर महाराज यांनी लेखी माफी मागितली आहे. त्यामुळे खोलात जाण्याची गरज नाही. भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

ते असं बोलले आहेत का? त्यांचा हेतू काय होता हे तपासलं पाहिजे. त्यांची कीर्तन करण्याची पद्धत सोपी असते. व्यसनमुक्ती सारखे काम ते करतात, याचाही विचार व्हावा, असं म्हणत पवारांनी इंदोरीकरांचंं समर्थन केलं असलं तरी चोकशीची मागणीही केली आहे.

दरम्यान, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

इंदोरीकरांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांची मोठी प्रतिक्रिया

“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होणार अन् खाणारा पुरूष…”

महत्वाच्या बातम्या- 

“इंदोरीकर महाराजांच्याविरूद्ध गेल्या तर तृप्ती देसाईंचं तोंड काळं करू”

सरकार डोंबिवलीचा भोपाळ होण्याची वाट बघतंय का?- राजू पाटील

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह नाशिकच्या पैलवानांचा इंदोरीकरांना पाठिंबा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या