मॅन्चेस्टर | आज विश्वचषकात भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाद फलंदाज रोहित शर्माने तुफानी शतक झळकावलं आहे.
रोहित शर्माने 85 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 9 चौकार तर 3 गगनचुंबी षटकार लगावले आहेत.
आपल्या सातत्यपूर्ण खेळीसाठी रोहित शर्मा ओळखला जातो. आजही त्याने शतकी खेळी करून पाकिस्तानला आपला हिसका दाखवला आहे.
दरम्यान, सध्या रोहित शर्मा 89 चेंडूंमध्ये 104 धावांवर खेळत आहे. त्याच्या साथीला कर्णधार विराट कोहली 26 चेंडूंमध्ये 20 धावांवर खेळत आहे. भारताने 32.1 षटकांमध्ये 188 धावांवर 1 गडी गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या
-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!
-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक
-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा
-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा
-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन
Comments are closed.