खेळ

रोहित शर्मानं केले 5 विक्रम; विराट आणि धोनीसुद्धा राहिले मागे

ऑकलंड |  भारतानं आज झालेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं या सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करत 29 चेंडूत 50 धावा केल्या.

रोहित शर्मा यानं यासामन्यात 5 नवे विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा ठरला आहे. त्यानं टी-20 मध्ये 2288 धावा केल्या आहेत.

आजच्या टी-20 सामन्यात अर्धशतक करत रोहितनं विराट कोहलीला मागं टाकलं आहे. रोहितनं 20 अर्धशतकं केली आहेत तर विराटच्या नावावर 19 अर्धशतकं आहेत.

दरम्यान, 2016 नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्मानं सर्वाधिक 202 षटकार लगावले आहेत, तर षटकार लगावण्याच्या बाबतीत तो चौथ्या स्थानावर आहे. रोहित टी-20 मध्ये 102 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर मार्टीन गप्टील 103 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. 

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या पोस्टरवर राहुल गांधी ‘रामा’च्या तर नरेंद्र मोदी ‘रावणा’च्या अवतारात

‘या’ जागेवर लोकसभा लढण्यासाठी काँग्रेसकडून तब्बल 57 उमेदवार इच्छुक!

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, व्याजासकट केली परतफेड

-मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य, मला माहित नाही- प्रणव मुखर्जी

“राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या