बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहितसाठी नरेन ठरतोय ‘गुलीगत धोका’! तब्बल इतक्या वेळा हिटमॅन अडकलाय नरेनच्या जाळ्यात

मुंबई | मुंबई आणि कोलकाताच्या सामन्यामध्ये काल कोलकाताने सहज विजय मिळवला. मुंबईच्या 156 धावांचा पाठलाग करताना कोलकाताने 7 गडी आणि 29 चेंडू राखत विजय मिळवला आहे. मुंबईची चांगली सुरूवात होऊनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुुंबईचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मानेही चांगली सुरूवात केली होती मात्र तो पुन्हा कोलकाताच्या सुनील नरेनचा शिकार झाला आहे.

रोहित शर्मा दुसऱ्या पर्वातील आपला पहिला सामना खेळत होता. चांगली सुरूवात केली होती मात्र फीरकीपटू सुनील नरेनने राहितला आपल्या जाळ्यात ओढलं.

सुनीलने आयपीएलमध्ये रोहितला तब्बल सातवेळा बाद केलं आहे. आयपीएलमध्ये नरेन रोहितला सर्वाधिक वेळा बाद दुसरा गोलंदाज ठरला आहे. अमित मिश्रा यानेही आयपीएलमध्ये रोहितला 7 वेळा बाद केलं आहे. त्यासोबतच विनय कुमारनेही 6 वेळा रोहितला बाद केलं आहे.

दरम्यान, मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात 33 धावांची खेळी केली होती. त्याच्यापाठोपाठ कायरन पोलार्डने 15 चेंडूत 21 धावांची खेळी केल्यामुळे मुंबई संघाला 156 धावांपर्यंत मजल मारता आली. परंतु मुंबईच्या या खेळीवर कालकाताच्या त्रिपाठी- अय्यर जोडीने पाणी फेरलं आणि कोलकाताने 7 गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला.

थोडक्यात बातम्या- 

अनिल देशमुखांवर मोठ्या कारवाईची शक्यता, ईडीनं उचललं हे पाऊल!

शेठ तुम्ही नादच केलाय थेट! दिनेश कार्तिकने धोनीला मागे टाकत केलाय हा भीम पराक्रम

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More