बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा असेल पण ‘हे’ दोन खेळाडूही आहेत रेसमध्ये!

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 मधील कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे. विराट कोहलीच्या निर्णयामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीनंतर आता कर्णधारपद आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

रोहित शर्मा जरी कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलं तरी थांबा दोन खेळाडूही या रेसमध्ये आहेत. कारण भविष्यातील संघबांधणीचा विचार केला तर एक युवा खेळाडू म्हणून ऋषभ पंत कर्णधारपदाच्या रेसमध्ये आहे.  दुसरा खेळाडू के. एल. राहुलही रेसमध्ये आहेत. राहुलनेही आयपीएलमध्ये कर्णधापदाची धुरा सांभाळण्यास आपण सक्षम आहोत.

दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्यावर ऋषभकडे दिल्लीचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं, अनेकांंना धक्का बसला होता. कारण दिल्ली संघामध्ये अजिंक्य रहाणे आणि आर. आश्विनसारखे अनुभवी खेळाडू असताना ऋषभ पंतला कर्णधारपद दिल्याने सर्वांनाचा धक्का बसला होता. मात्र त्यानेही ते आव्हान लिलया पेललं आहे.

दरम्यान, के. एल. राहुलही पंजाब संघाचं कर्णधारपद चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. युवा खेळाडूंना घेऊन आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राहुल सामने जिंकत आहे. त्यामुळे राहुल आणि पंत हे दोन खेळाडू रोहितसोबत कर्णधारपदाच्या रेसमध्ये आहेत.

थोडक्यात बातम्या- 

विराट कोहलीने ‘या’ 4 जणांशी चर्चा करत घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय!

…अन् नो बाॅलवर माझी विकेट पडली – संजय राठोड

मोठी बातमी! विराट कोहली सोडणार भारतीय संघाचं कर्णधारपद

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

‘भाजपमध्ये दरेकरांसारख्या नेत्यांचा….’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच सुरेखा पुणेकर कडाडल्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More