रोहित शेट्टीनं घेतली नवी कार, चर्चा तर होणारच!

मुंबई | आपल्या सिनेमांमध्ये कार उडवण्याची रेलचेल करणाऱ्या दिगदर्शक रोहित शेट्टीची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे. निमित्त आहे त्याची नवीकोरी कार…

रोहितनं नुकतीच मस्सेराटी ग्रँट टुरिझ्मो स्पोर्ट् ही कार खरेदी केलीय. या कारसाठी त्यानं 1 कोटी 72 लाख रुपये एवढी रक्कम मोजलीय. गोलमाल अगेन हिट झाल्यानं त्यानं स्वतःलाच ही कार गिफ्ट केल्याचं बोललं जातंय. 

6 स्पीड ZF ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली ही गाडी अवघ्या 4.7 सेकंदांमध्ये 100 किलोमीटरचा वेग पकडते.