Top News खेळ

2 बॉल, 4 सिक्स आणि 27 धावा; चेन्नईच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

शारजाह | आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यानच्या सामन्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. 2 बॉल, 4 सिक्स आणि 27 धावा अशी अनोखी किमया पहायला मिळाली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला याची प्रचिती सामना पाहणाऱ्या अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवली आहे.

#RR विरुद्ध #CSK सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर संजू सॅमसननं षटकारांचा पाऊस पाडत 32 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मीथनं 47 चेंडूत 69 धावा केल्या, मात्र शेवटच्या षटकात जे घडलं ते अविश्वसनीय होतं.

राजस्थानकडून फलंदाजी करत होता जोफ्रा आर्चर, तर चेन्नईकडून गोलंदाजी करत होता एंगिडी. पहिल्या दोन्ही चेंडूंवर जोफ्रा आर्चरने षटकार ठोकले, तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला, मात्र हा नो बॉल होता. त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट होता, या चेंडूवर जोफ्रानं पुन्हा षटकार ठोकला मात्र एंगिडीकडून हाही नो बॉल टाकला गेला होता. त्यानंतर एंगिडीनं टाकलेला बॉल वाईड होता. अशाप्रकारे एंगिडीनं फक्त 2 चेंडूच टाकले होते, मात्र 4 षटकारांसह त्याने 27 धावा दिल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या 4 चेंडूत त्याने फक्त 3 धावा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थानच्या संजू सॅमसननं पाडला षटकारांचा पाऊस; 32 चेंडूत काढल्या इतक्या धावा!

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

“आम्ही आणलेली शेतकरी विधेयक काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यात होती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या