मंत्रजप करा, चीनला युद्धात हरवा; संघाचा अनोखा फॉर्म्युला

नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये संघर्षाचं वातावरण असताना आता चीनला युद्धात हरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावासियांना एका मंत्राचा जप करण्याचं आवाहन केलंय. ‘कैलाश, हिमालय और तिब्बत चीन की असुर शक्ति से मुक्त हों’, असा हा मंत्र आहे.

मेल टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी मेल टुडेशी बोलताना ही माहिती दिली.

या मंत्रजपानं फक्त चीनचंच नुकसान नाही होणार तर आपली अध्यात्मिक शक्ती सुद्धा वाढेल असा दावा इंद्रेश कुमार यांनी केलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या