Top News कोरोना मुंबई

हा घ्या पुरावा…RSS स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा- चित्रा वाघ

मुंबई | धारावी परिसरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचं श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

चित्रा वाघ यांनी हे फोटो धारावीत काम करणाऱ्या RSS स्वयंसेवकांचे आहेत. या फोटोत RSS स्वयंसेवक नागरिकांचे स्क्रीनिंग करताना दिसतायत. संघाच्या 800 स्वयंसेवकांच्या कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. या स्वयसेवकांनी धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणं, अन्नधान्य पुरवणं यासारखी महत्त्वाची कामे केली. यादरम्यान काही स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे मागितले होते. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी हे फोटो शेअर केलेत.

यापूर्वी  महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही, सगळं श्रेय सरकारने घेण्याचं कारण नाही. स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केलं असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

कार्यकारी अध्यक्ष होताच हार्दिक पटेलांनी केलं चुकीचं ट्विट, ट्रोल झाल्यावर केलं डिलीट

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या