इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा हसन रुहानींची वर्णी

Hasan rouhani
Photo- REUTERS/Lucas Jackson

नवी दिल्ली | इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची वर्णी लागली आहे. रूहानी यांना १ कोटी ४० लाखांहून अधिक मते मिळाली असून निवडणूक आयोगाचे प्रमुख अली असगर अहमद यांनी हे आकडे जाहीर केले आहेत.

रुहानी यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना १ कोटीच्या आसपास मते मिळाली आहेत. दरम्यान, उदारमतवादी आणि सुधारणावादी अशी ६८ वर्षीय रुहानी यांची ओळख आहे.