बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली असून, देशमुख यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर राजकीय क्षेत्रातुन प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली.  देशमुख यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याची माहिती समजत आहे.  यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईकर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.

दरम्यान, कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असं म्हणत संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आधी पत्नी-मुलीला संपवलं त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेसोबत… अत्यंत धक्कादायक प्रकार

कुठं बेड मिळेना, दुर्दैवी पत्नी पतीला तोंडाने श्वास देत राहिली मात्र…

कोरोनाग्रस्तांना बेडसाठी भरत जाधवची आयडियाची कल्पना, “हीच ती वेळ आपले कर्तव्य बजावण्याची”

संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

‘आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना’; लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More