बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

पुणे | खडकवासला विधानसभा मतदारसंघात मला उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती, मात्र मी स्वतः उमेदवारी नाकारल्याने ती दुसऱ्या व्यक्तीला मिळाली, असा खुलासा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

#AskRupaliTai नावाने हॅशटॅग चालवून रुपाली चाकणकर यांना ट्विटरवर प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये प्रवीण नावाच्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांना एक प्रश्न विचारला होता. खडकवासलामधून तुम्हाला तिकीट मिळाले नाही म्हणून तुम्ही पक्षाचं काम मनापासून केलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पडला हे खरंय का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

खडकवासलामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्षाकडे अर्ज दाखल केला होता, पण त्याच कालावधीत प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली, यामुळे पदभार स्विकारल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर दौरा सुरु केला, माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पेलणं मला महत्त्वाचे वाटले, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.

तसेच उमेदवारी देताना आदरणीय साहेब, दादा आणि ताई यांनी विचारले होते, मीच स्वतःहून उमेदवारी नाकारली म्हणून ती दुसर्या व्यक्तीला दिली. बरेच जण पक्ष सोडून जात असताना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची होती. राज्यभर उमेदवारांचा प्रचार केल्यानंतर, शेवटचे दोन दिवस मी स्वतः मतदार संघात दिले, विशेष म्हणजे मी दौऱ्यात असताना मतदारसंघात माझे कुटुंब प्रचाराची धुरा सांभाळत होते, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More