बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या त्या आरोपांना चाकणकरांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या….

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात सुरू केलेलं आंदोलन जोर धरत आहे. अशातच चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी संपत्ती बाळगल्या संबंधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात माझा आवाज दाबण्यासाठी सुडबुद्धीने हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं दाखल केला गुन्हा 2016 साली भाजप सत्तेत असताना दाखल झाला होता. त्याची चौकशी आज गुन्हा दाखल होण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. यात सुडबुद्धीचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे.

याशिवाय पूजा चव्हाण आत्महत्याविषयी बोलताना, आम्ही सुद्धा आजपर्यंत सत्तेत असताना किंवा विरोधात असताना अशा अनेक प्रकरणांमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. अनेक प्रकरणात पीडित व्यक्तिला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत, पण कधीच पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांच जगणं मुश्किल होईल असं कोणतंही कृत्य केलं नाही, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दी प्रकरणात पूर्ण चौकशी होईल आणि चौकशी अंती कारवाई होईल असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या-

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

“खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

“बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?”

“उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं”

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More