“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”
मुंबई | पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी काही दिवसांपुर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटर बाॅम्ब’ फोडून भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते देशमुखांच्या बचावासाठी आक्रमक झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रावादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी परमबीर सिंग यांच्यावर परखड टीका केली आहे.
नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. असं कसं चालेल, असं ट्विट चाकणकर यांनी केलं आहे. #ParambirExposed हा हॅशटाॅग देऊन त्यांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला आहे. तर त्यात पुढे नाव ‘परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी’ असं मथळा याल दिला आहे.
मुंबईत चार कोटी रूपयांचे दोन फ्लाॅट तर हरियाणात आपल्या गावी त्यांनी चार कोटी रुपयांचे घर घेतल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती देखील आहे. अंधेरीतल्या वसुंधरा सोसायटीत 48.75 लाख रूपयांचा फ्लाॅट घेतला आहे. तर 2019 मध्ये त्यांनी 14 लाख रुपयांची जमिन खरेदी केली आहे, हरियाणात त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या नावे संयुक्तपणे चार कोटी रूपयांचे घर आहे, अशी माहिती चाकणकरांनी दिली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या बदली विरूद्ध त्यांनी सर्वोेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून सर्वोेच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं होतं आणि त्याच बरोबर त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सुचना केली आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स
“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”
देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता
“रश्मी शुक्ला यांनी पेन ड्राईव्ह दिला नव्हता तर, फडणवीस कोणत्या पेन ड्राईव्ह बद्दल बोलत होते?”
भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.