बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महिला सुरक्षेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील”

पुणे | मुंबईमध्ये भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. सेना आणि राष्ट्रवादीने या मुद्द्यावरून भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

महिला सुरक्षिततेबाबत विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घ्यावी, ही राज्यपाल यांना विनंती आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहतील, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील महिला का सुरक्षित नाहीत तर कारण भाजपच्या कार्यालयामध्ये  महिलांचा विनयभंग केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिला कशा सुरक्षित राहतील, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी बोलताना चाकणकर यांनी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपच्या ज्या बोलबच्चन महिलापदाधिकारी आहेत. त्या पत्रकार परिषदा घेत महिला सुरक्षित नाहीत हे सांगतात त्यांनी आपल्या कार्यालयात काय चाललं आहे हे पाहिलं तरी महिला सुरक्षित राहतील, असं चाकणकर म्हणाल्या.

 

थोडक्यात बातम्या-  

धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन ट्रेंड!

“किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरील आरोप थांबवावे, नाहीतर…”

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची प्राणज्योत मालवली, उद्या होणार अंत्यसंस्कार

”हा’ आजार दूर करण्यासाठी मद्यपान कर आणि शरीरसंबंध ठेव’; मुंबईच्या डॉक्टरचा मुलीला अजब सल्ला 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More