पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रावादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विद्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. चव्हाण यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. ते असं काही करणार नाहीत. केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
विद्या चव्हाण यांची ही केस सध्या कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे. जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल, असं मतही रुपाली चाकणकर यांनी मांडलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाने या प्रकरणावरून राष्ट्रवादी धारेवर धरलं आहे. यासंदर्भात भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना चव्हाण यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?, असा सवाल केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
माझ्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
“मोदींनी सोशल मीडिया सोडला तर त्यांचे करोडो फाॅलोवर्स अनाथ होतील”
महत्वाच्या बातम्या-
“सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली, भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही”
सर्वोच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणवीसांना झटका; टेंशन वाढणार!
भाजप नेता म्हणतो, 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा!
Comments are closed.