पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यात सर्वत्र महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. त्यांनी केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.
अबला नको सबला बन… यौवनांना रोखण्यासाठी तू जिजाऊ हो, त्याच हैवानांच्या छाताडावर पाय रोवून उभी राहणारी तू महाराष्ट्राची लेक राणी लक्ष्मीबाई हो, याच तुला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, असं ट्विट करत चाकणकर यांनी एका छोट्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे सुन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी लहान मुलीला सक्षम होण्याचा नारा दिला आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी बाईक रॅली काढत शिवजयंती सिंहगडावर साजरी केली. यावेळी अनेक महिला त्यांच्यासोबत होत्या. तसेच चाकणकर यांनी प्रसंगाचे अनेक फोटोही शेअर केले आहे.
अबला नको सबला बन…
यौवनांना रोखण्यासाठी तू जिजाऊ हो,त्याच हैवानांच्या छाताडावर पाय रोवून उभी राहणारी तू महाराष्ट्राची लेक राणी लक्ष्मीबाई हो,
याच तुला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..#शिवजन्मोत्सव #सिंहगड@NCPspeaks @SpeaksMVA pic.twitter.com/RIPCRkqYKx— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 19, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
हे तर ईश्वरी काम, ‘त्या’ चौकशीला तयार- सुधीर मुनगंटीवार
छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र- अमिताभ बच्चन
महत्वाच्या बातम्या-
शिवजयंती निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरेंचा खास संदेश
26/11 ची फेरचौकशीची मागणी करणारं भाजप पाच वर्षे काय विटीदांडू खेळत होतं का?- काँग्रेस
मोदी आवडतात, पण आताच त्यांच्याशी व्यापारी करार नाही- ट्रम्प
Comments are closed.