मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीआधी आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप-मनसे यांच्या युतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना टोला लगावला आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी सांगत आह, असा आरोप काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केला होता. येत्या 1 मार्चला विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. सध्या राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव ‘विधीमंडळ कोरोना’ असं आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा आहे, त्यामुळे सरकार कोरोना आकडेवारी वाढवून सांगत आहे, असा आरोप देशपांडे यांनी केला होता.
राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी संदीप देशपांडेंना उत्तर दिलं आहे. मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रीमंडळात जे कोणी शॅडो गृहमंत्री आहेत त्याच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी, असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे. इंग्लंड आणि अमेरिकेच्या शासनाची संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात राबवली आहे. सरकारवर विरोधी पक्षाचे नियंत्रण रहावे यासाठी मनसेमध्ये शॅडो मंत्रिमंडळ तयार केले गेले आहे. राज ठाकरेंच्या याच शॅडो मंत्रिमंडळाची रूपाली चाकणकर यांनी खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खंडणीचे आरोप केले होते. शिवसेनेचा उल्लेख ‘विरप्पन गँग’ असा केला होता. यावर मनसे पक्ष आहे की संघटना काही कळतं नाही, असं प्रतिउत्तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं.
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी.(2/2)@NCPspeaks @thodkyaat @MaxMaharashtra @MySarkarnama @MHD_Press @TV9Marathi @abpmajhatv @News18lokmat @JayMaharashtrN @zee24taasnews
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 22, 2021
थोडक्यात बातम्या-
नवीन कार घेण्याचा विचार करताय; ‘ही’ कंपनी देतेय दीड लाखापर्यंतचा डिस्काऊंट
मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा
मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण
संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता