Top News मनोरंजन

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने केलेल्या विनोदामुळे संतापाची लाट उसळली. यानंतर अग्रिमा जोशुआ हिला अटक करण्याची मागणीही राज्यभरातून करण्यात आली. मात्र याचदरम्यान मराठी अभिनेत्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात केतकीची मनेसेने चांगलीच कानउघडणी केली आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधलाय. रुपाली पाटील म्हणाल्या की, “केतकी यावेळी तू चुकलीस. मागे तुला ट्रोल केलं म्हणून आम्ही महिलेला असं ट्रोल करू नये, असं नेटकऱ्यांना सुनावलं होतं. नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त विधान करून लोकांना त्रास देण्याचं काम करते आहे.”

यावेळी तू चुकलीस ,मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये म्हणून नेटकर्यांना सुनावले होते

नावडती…

Posted by Rupali Patil Thombare on Saturday, July 11, 2020

“3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्याने आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,” असं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय.

माझं तुला मनसे सांगणं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि करोडो मावळ्यांचे मनावर ते राज्य करत आहे. त्यामुळे कितीही शिकलेले असू द्या, आपली सद्सद्द्विवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या उच्च शिकण्याचा काहीच उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्याबाबतीत लोक संवेदशील असतात. त्यामुळे अशा दैवताबद्दल, महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळलंच पाहिजे.” असा रूपाली पाटील यांनी इशारा दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

रूग्णाची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या, पण लक्षात ठेवा…., फडणवीसांचा सरकारला इशारा

‘नया है वह…’ म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

महाराष्ट्रातल्या या शहरात लॉकडाऊन वाढवला, आयुक्तांनी काढले आदेश

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या