बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्यापुर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रूपाली पाटील ठोंबरे (RupaliPatil Thombare) यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. येत्या एक दोन दिवसात त्या नवीन पक्षात प्रवेश करण्याबद्दल घोषणा करू शकतात असा अंदाज आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरेंना पत्र लिहित आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून देखील राजीनामा दिला आहे. रूपाली पाटील या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहात होत्या. तर रूपाली पाटील मनसेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका देखील आहेत.

राजीनाम्यानंतर रूपाली पाटील यांना शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांकडून ऑफर असल्याचं बोललं जात आहे. राजीनामा देण्याआधी रूपाली यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व नंतर युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतली. त्यामुळे रूपाली पाटील मनगटावर घड्याळ बांधणार की शिवबंधन याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रूपाली पाटील यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. ‘पण तरीही सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नाव ह्रदयात दैवत म्हणून कोरलेले कायम राहील’, अशी पोस्ट रूपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

मृत स्वप्नील लोणकर मुलाखतीसाठी पात्र! वडिलांचा MPSC वर आरोप, म्हणाले…

अखेर शाळेची घंटा वाजणार! उद्यापासून राज्याच्या ‘या’ भागातील शाळा सुरू

सनी लिओनी म्हणते,”हा प्रसिद्ध चित्रकार कोण?”; अनिल कपूरनं दिलं भन्नाट उत्तर

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More