रूपाली ठोंबरे आक्रमक, केतकी चितळेला दिला गंभीर इशारा
पुणे | अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट केली आहे. केतकी चितळेने पोस्ट केल्याने वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केतकी चितळेवर तोफ डागली आहे.
बदनामी केली म्हणून 504 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल करून असे विकृत जागेवर येत नसतात. केतकी सारखे तर नाहीचं नाही. केतकी चितळेला ट्रोलर्सने अपशब्द वापरले होते. तेव्हा ट्रोलर्सने अशा पद्धतीने भाषा वापरू नये, असं म्हटलं होतं. मात्र आता तिने कळस गाठलेला आहे, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
केतकीला पाच सात छड्या मिळाल्या तर गेलेली स्मृती जाग्यावर येईल. तुझं वय काय?, तु तुझ्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला अशी भाषा वापरते. ही मनोरूग्ण आणि गंजाडी अभिनेत्री आहे. तिने लिहिलं आहे की, ब्राम्हणांचा मत्सर वगैरे, काय संबंध आहे?, असा सवाल रूपाली पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, ती एक आजारी आहे. तिला सायकोलॉजीची कोणतीतरी ट्रीटमेंट सुरू आहे. तिच्या आईवडिलांचे दुर्देव म्हणावं लागेल की त्यांनी तिला संस्कार दिले नाहीत. तिने पोस्ट करताना अॅड. नितीन भावे लिहिलं आहे. मला वाटत नाही की, कोण नितीन भावे असतील. केतकीला तिच्याच भाषेमध्ये चांगला चोप देण्यात येणार आहे, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”
‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed.