बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाई जरा दमानं घ्या’, अमृता फडणवीसांवर रुपाली ठोंबरे बरसल्या!

मुंबई | बाई जरा दमानं घ्या , वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत, अशा शब्दांत मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. रूपाली ठोंबरेंनी याबाबत एक पोस्ट केली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. यालाच रूपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ते ठाकरेच होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे? मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवलं आता तुम्ही भानावर या काहीही बिनबुडाचं बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सुदबुद्धि मागा लवकर देईल बाप्पा, अशी फेसबुक पोस्ट करत रुपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून आपण काय योगदान दिलं महाराष्ट्रातील जनतेला. याचं थोडंतरी आत्मपरीक्षण करा आणि तसंही महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना नाकारलं आहे, असं म्हणत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More