मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
कीव | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयावह होत आहे. मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हादरत आहे. त्यात अनेक देशांतील नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत नेण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनमधील युद्ध तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाने काही तासांसाठी युद्ध थांबत असल्याचं जाहीर केलं आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशात परत जाण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार केलं जाणार आहे. त्यामुळे रशियाने काही तासांसाठी युद्ध थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपेशन गंगा सुरू केलं आहे. रशियाने काही तासांसाठी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे”
संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही…
“हाताची घडी तोंडावर बोट याचं मोठं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे”
पुणेकरांनो सावधान, गेल्या 24 तासांतील ओमिक्रॉन रूग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर
Comments are closed.