रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाचे तीव्र पडसाद आता पाहायला मिळत आहेत. रशियाकडून होत असलेले मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले यामुळे युक्रेन हादरलं आहे. तर युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमधील खार्कीव येथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवलं असल्याची बातमी देशातील अनेक प्रमुख वृत्तवाहिन्यांनी दिली होती. रशियाने काही तास युद्ध थांबवल्याच्या बातमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
रशियाने भारतासाठी युद्ध थांबल्याच्या बातम्या चूकीच्या असल्याचं परराष्ट्रमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त रशियाच नाही तर युक्रेननेही भारतीय नागरिक सुरक्षित बाहेर पडावेत, आजूबाजूच्या सीमांवर सुरक्षित पोहोचावेत यासाठी प्रयत्न केले आहेत, असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगाची सुरूवात केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यांशी दुसऱ्यांदा फोनवर चर्चा केली आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…
“…तर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”
नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला; वाचा न्यायालयात नेमकं काय घडलं?
आदित्य ठाकरेंच्या एन्ट्रीची एकच चर्चा; राज्यपालांच्या अभिभाषणावर म्हणाले…
Comments are closed.