Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”
नवी दिल्ली | युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडे तणावपूर्ण परिस्थिती आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजधानी कीवचे विमानतळ रिकामे करण्यात आलं आहे.
युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती युक्रेननं केली आहे. युक्रेनचे भारतातील राजदूत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहे. त्यामुळे आता यावर मोदी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताच रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करतो, असंही भारतीय राजदूतनं म्हटलं आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये बरीच अनिश्चितता आहे. शांत कायम ठेवा आणि तुम्ही तुमच्या घरात, वसतिगृहात किंवा रस्त्यांवर कुठेही असाल तिथे सुरक्षित राहा’, असा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आलाय.
थोडक्यात बातम्या –
Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर
रशियन सैनिकांच्या निशाण्यावर युक्रेनच्या महिला; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट
रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.