नवी दिल्ली | युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती गंभीर असताना रशियाने (Russia) त्यांचे हल्ले तीव्र केले आहेत. पंधरा दिवस उलटले मात्र रशिया-युक्रेन युद्ध आजही सुरूच आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Russia-Ukraine Crisis)
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बँध लादले. रशियाकडून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू खरेदी न करण्याचा निर्णय अमेरिकन जो बायडन (Jo Biden) यांनी घेतला. जो बायडन यांच्या घोषणेनंतर रशियाने अमेरिकेला धक्का देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
सोन्यातील गुंतवणुक अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अमेरिकन डॉलरला धक्का देण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी मोठी घोषणा केली. सोन्याच्या खरेदीवर लागणारा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट हटवण्याची घोषणा पुतिन यांनी केली आहे.
दरम्यान, रशियामध्ये आधी सोनं खरेदीवर किमतीच्या 20 टक्के व्हॅट द्यावा लागत होता. व्हॅट हटवल्याने आता सोनं अधिक स्वस्त होणार आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेक रशियन चलन रूबलचं मूल्य घसरत आहे. लोकांनी रूबलमध्ये गुंतवणूक करावी या उद्देशाने रशियाने हा निर्णय घेतला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर
रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा
भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?
कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार
“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Comments are closed.