बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेगॅससचे खरे बाप देशातच”; सामनातून शिवसेनेची ‘ही’ आक्रमक मागणी

मुंबई | इस्त्रायली सॉफ्टवेअर पेगॅससच्या माध्यमातून देशातील काही निवडक लोकांवर केल्या गेलेल्या हेरगिरीचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच गाजत आहे. विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच घेरलं असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरुन गदारोळ पहायला मिळत आहे. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर कोरडे ओढले आहेत.

पेगॅसस हा निवडक हिन्दुस्थानींवर झालेला सायबर हल्ला आहे आणि केंद्र सरकारच्या संमतीशिवाय तो होऊच शकत नाही. त्यामुळे पेगॅससमार्फत केल्या गेेलेल्या हेरगिरीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणतात, “हे देशाला आणि लोकशाहीला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.” गृहमंत्र्यांची असं वक्तव्य करावं हे आश्चर्य आहे. ते सांगू शकतील का हे काम नेमकं कोण करतंय?, असा सवालही सामनामध्ये विचारण्यात आलाय.

संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्यू मोटो दाखल करुन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे. अशी चौकशी करण्यातच राष्ट्रहीत आहे. मात्र राष्ट्रहीत आणि राष्ट्राची फिकीर याची खरंच कोणाला काही पडली आहे का?, देश अंधाऱ्या गर्तेत सापडलाय, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, काही मूठभर लोक आणीबाणी लादल्याचा काळा दिवस प्रतिवर्षी साजरा करत असतात, मात्र पेगॅसस हल्ला तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. या हल्ल्याचे खरे बाप आपल्याच देशात आहे, पहिले त्यांना शोधा… असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

‘कोरोना को मत डरो ना…’; रामदास आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत एकच हशा

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More