मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळून लावत रेणू शर्माची मोठी बहिण करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं होतं.
मात्र यावरून भाजप महिला आघाडीने हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नसल्याचं म्हणत मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजप महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, सचिन सावंतांच्या खोचक टोल्यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या #भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर #भाजपा तील काही नेते टेंशन मध्ये आले असतील https://t.co/8wy6inE3jJ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2021
थोडक्यात बातम्या-
पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!
मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???
“धनंजय मुंडे प्रकरणात सरकारवर कोणताही दबाव नसून मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही”
‘…अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार’; वडेट्टीवारांनी हाय कमांडकडे केली ‘ही’ मागणी
उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन राऊत