Top News

“दाढी वाढवून स्वत:ची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही”

Photo Courtesy- Facebook/Narendra Modi

मुंबई | राज्य सरकारकडून साधेपणाने शिवजयंती साजरी केली जावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यानंतर सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये, असा टोला सचिन सावंतांनी भाजपला लगावला आहे.

दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही, असा टोला देखील सचिव सावंत यांनी भाजपला लगावला आहे.

शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या ह्रद्यात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली तीच महाविकास आघाडी सरकार घेत आहेत. शिवरायांचा राजधर्म हाच होता, असं सचिन सावंत म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या