Top News मनोरंजन राजकारण रायगड

“एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो”

मुंबई | फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचं दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा तर आहेच. शिवाय भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचाही तो एक भाग आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीये.

सावंत म्हणाले, मुंबई पोलिसांनी जो घोटाळा उघड केला त्यामध्ये भाजपचा अजेंडा राबवणाऱ्या एका वाहिनीने फ्रॉड करुन आपला टीआरपी जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सदर वाहिनीने सुशांतसिंगची आत्महत्या नसून त्याला मारलं गेलंय असं बिंबवण्याचा प्रयत्न केला.

एम्स पॅनेलचा रिपोर्ट आल्यानंतर या वाहिनीद्वारे केलेले दावे खोटे असल्याचं समजलं. परंतु भाजप सदर वाहिनीची गेलेली पत सांभाळण्यासाठी आणि बिहारच्या निवडणुकीत मुखभंग होण्याचं टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याकरता सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अखेर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

‘राजा रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार?’; विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या