“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

मुंबई | आईसोबत गेला असता दोन वर्षांचा दिव्यांश खुल्या चेंबरमध्ये पडला. आणि त्यानंतर 24 तासाच्या आत माझा मुलगा सापडला नाही तर मी आत्महत्या करेन, असा इशारा दिव्यांशच्या वडिलांनी दिली होता. मात्र 48 तास उलटूनही चिमुरड्या दिव्यांशचा शोध लागला नाही.

दिव्यांशचा शोध लागत नसल्याने सर्वच स्तरातून मुंबई महापालिकेवर टीका होतीये. शिवसेना आणि मुंबई महापालिकेविरोधात 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

गेल्या वर्षी डाॅक्टर दीपक अमरापूरकर यांचा गटारात पडून मृत्यु झाला होता. यावर बीएमसी अतिशय लाजिरवाणी उत्तरं देत असल्याचं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईकरच गटाराची झाकणं उघडी ठेवतात आणि त्यामुळेच अपघात होतात असा अजब दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…

-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध

-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

Loading...