महाराष्ट्र मुंबई

“चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले”

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. तसेच भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याची कामे करू नये, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

मागील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना कधीच विश्वासात घेतले नाही. पण महा विकास आघाडी सरकारने सर्वांना सोबत घेऊन, आरक्षणाच्या मुद्यावर काम केले आहे. हे पाहून भाजपच्या नेत्यांमध्ये पोटदुखी दिसून येत आहे. यातूनच भाजपचे नेते समाजात अपप्रचार करण्याचं काम करीत आहे, हे त्यांनी लवकर थांबवावं, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले असून संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात तीन वेळा पत्र पाठवलं. भेटीची वेळ मागितली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिला नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

मराठा आरक्षणासारख्या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार आपली भूमिका का जाहीर करत नाही असा सवालही सचिन सावंत यांनी विचारलाय.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या